Home नागपूर नागपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; 180 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

नागपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; 180 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

नागपूर : नागपूर महिला काँग्रेसमध्ये खदखद असल्याचं दिसून आलं आहे. महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव प्रज्ञा बडवाईक यांच्यासह 180 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

नागपूर शहर अध्यक्षपदी नॅश अली यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळं महिला काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर असून नॅश अली यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

हे ही वाचा : माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांत घेतोय, तुम्ही निवडणूकीच्या तयारीला लागा; उद्धव ठाकरेंनी दिले आदेश

दरम्यान, शहराध्यक्ष पदावरून प्रदेश सचिवपदी पदोन्नती देण्यात आलेल्या प्रज्ञा बडवाईक यांनी राजीनामा दिला. त्यांच्यासह 180 महिला पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. यामध्ये विभागीय अध्यक्ष आणि ब्लॉक अध्यक्ष यांचाही समावेश आहे. त्यामुळं काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

अनाथ मुलांची मायेची सावली हरपली- प्रविण दरेकर

असा होता सिंधूताईंचा खडतर जीवनप्रवास; वाचा सविस्त

सेना-भाजपमधला युतीचा पूल गडकरीच बांधू शकतात; शिवसेना नेत्याच्या विधानामुळे युतीच्या चर्चांना उधाण