Home महत्वाच्या बातम्या राज्यात लॉकडाऊन लागणार का?; बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

राज्यात लॉकडाऊन लागणार का?; बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकारकडून आता पावलं उचलण्यात येत आहेत. त्याच संदर्भात आज मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात कठोर निर्बंध लावावेत की लॉकडाऊन लावावे या संदर्भात चर्चा झाली.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना याविषयी सविस्तर माहिती दिली. राज्यातली सध्याची परिस्थिती पाहाता टास्क फोर्सनं लॉकडाऊनऐवजी ऑगमेंडेट रिस्ट्रीक्शन्स लागू करण्याचा प्रस्ताव दिल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले.

हे ही वाचा : नागपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; 180 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

टास्क फोर्सनं ऑगमेंटेड रिस्ट्रीक्शन्स असा शब्द वापरलाय. म्हणजे अशीच संख्या वाढत गेली, तर लॉकडाउनसारखा 100 टक्के बंद करण्याची आज तरी गरज नाही. पण अनावश्यक गोष्टींवर दररोजची रुग्णसंख्या तपासून बंधनं आणता येतील का? याविषयीचा निर्णय घेतला जाईल. या विषाणूला रोखण्यासाठी गर्दी थांबवणं गरजेचं आहे. त्यानुसार गर्दी करणाऱ्या गोष्टींवर काही निर्बंध टाकण्यासाठी निर्णय घेतला जाईल. पण आजच त्यावर निर्बंध टाकले जातील, असं नाही. मुख्यमंत्र्यांना त्यावर माहिती दिली असून त्या त्या वेळी त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं राजेश टोपेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, आता बैठकीत झालेल्या चर्चा आणि निर्णयाचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर आज रात्री नवे निर्बंध लावण्याच्या संदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना येतील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांत घेतोय, तुम्ही निवडणूकीच्या तयारीला लागा; उद्धव ठाकरेंनी दिले आदेश

अनाथ मुलांची मायेची सावली हरपली- प्रविण दरेकर

असा होता सिंधूताईंचा खडतर जीवनप्रवास; वाचा सविस्त