Home महत्वाच्या बातम्या असा होता सिंधूताईंचा खडतर जीवनप्रवास; वाचा सविस्तर

असा होता सिंधूताईंचा खडतर जीवनप्रवास; वाचा सविस्तर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : अनाथांची माय ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं दु:खद निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. सुरुवातीपासूनच त्यांचे जीवन संघर्षात गेले. घरच्यांना मुलगी नको होती, मात्र तरी देखील मुलगी झाली. त्यामुळे सिंधुताई यांचं नाव घरच्यांनी चिंधी ठेवलं होतं.

नवरगाव ही त्यांची जन्मभूमी होती. हलाकीच्या परिस्थितीमुळे त्यांना वडिलांच्या घरी पडेल ते काम करावे लागायचे. मात्र अशाही परिस्थितीमध्ये सिंधुताई यांनी चौथीपर्यंत शिक्षण घेतले.

हे ही वाचा : सेना-भाजपमधला युतीचा पूल गडकरीच बांधू शकतात; शिवसेना नेत्याच्या विधानामुळे युतीच्या चर्चांना उधाण

वयाच्या 9 वर्षी त्यांचा विवाह झाला. त्यांचे पती श्रीहरी सपकाळ हे त्यांच्यापेक्षा 26 वर्षांनी मोठे होते. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी समाजकारणात उडी घेतली. त्यांनी त्याकाळात गुरे राखणाऱ्या स्त्रीयांचे प्रतिनिधित्व केले. या स्त्रीयांना काबाड कष्ट करावे लागायचे मात्र त्याबादल्यात त्यांना मजुरी मिळत नव्हती. याविरोधात सिंधुताई यांनी लढा उभारला आणि जिंकला देखील.

दरम्यान, सासरचे घर सोडल्यानंतर त्यांनी अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ मुलांना आधार दिला.

महत्वाच्या घडामोडी – 

“अनाथांची माय हरपली, ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं दु:खद निधन’

आगामी सातारा पालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार- शिवेंद्रराजे भोसले

शिवसेनेच्या भगव्याला कवटाळून उस्मानाबादेत कट्टर शिवसैनिकाची आत्महत्या; राजकीय वर्तुळात हळहळ