सोलापूर : शिवसेना असं रसायन आहे की, ज्यामुळे अगदी सामान्य लोकही आमदार, खासदार आणि मंत्री झाले. अगदी सायकल चोरणारे नारायण राणे यांनाही मुख्यमंत्रीपदी बसण्याचा मान मिळाला, असे वक्तव्य शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले. ते सोलापूरात एका कार्यक्रमात बोलत होते.
हे ही वाचा- बाकी ठिकाणी धाडी पडल्या तर चालते, आणि घरी पडल्या तर…- चंद्रकांत पाटील
शिवसेनेमुळे टोपली फिरवणारे चंद्रकांत खैरे खासदार झाले, मुरारी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले, रिक्षा चालवणारे दिलीप भोळे आमदार झाले, पानटपरी चालवणार गुलाबराव पाटील तुमच्यासमोर मंत्री म्हणून उभा आहे. हे सोडा, पण सायकल चोरणारे नारायण राणेही शिवसेनेमुळे मुख्यमंत्री झाले, असं गुलाबराव पाटील यांनी यांनी म्हटलं.
दरम्यान, त्यामुळे आता नारायण राणे या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मी कोणत्याही मंत्रीपदावर नाही, याचं मला कोणतंही दु:ख नाही- पंकजा मुंडे
क्या हुआ तेरा वादा?; पुण्यात राष्ट्रवादी भाजपला करुन देणार वायद्यांची आठवण
हर्षवर्धन पाटलांनी आपण भ्रष्ट आहोत हे स्वतःहूनच मान्य केलं- रूपाली चाकणकर