आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुंबईच्या मुलुंड वेस्ट परिसरातल्या एका सोसायटीत मराठी असल्यामुळे एका महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला. संबंधित महिलेनं यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यानंतर मनसेनं त्याची दखल घेऊन या सोसायटीच्या सेक्रेटरींना समज दिली. त्यापाठोपाठ त्यांनी महिलेची माफी मागितली. मात्र, अरेरावी करणाऱ्या या सेक्रेटरी व त्यांच्या वडिलांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेनंतर विरोधक सत्ताधाऱ्यांवर सातत्याने टीका करत आहेत. तर दुसरीकडे आता खुद्द भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही घर मिळवण्यासाठी आलेला कटू अनुभव सांगितला.
ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! ‘या’ मुद्द्यांवरुन अजित पवार आणि छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी
शासकीय बंगला सोडल्यानंतर जेव्हा मुंबईत मी घर शोधायला गेले तेव्हा मलादेखील मराठी म्हणून घर नाकारण्यात आल्याचा अनुभव आला., असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
मराठी लोकांना आमच्या भागात घर देत नाही, हे मीदेखील अनुभवले आहे, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रात असे प्रकार घडत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच मुलुंड येथे घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे. भाषावाद, प्रांत या विषयावर मी कधी भाष्य करत नाही. परंतु सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहून मन दुखी होते. मराठी म्हणून जागा नाकारल्यानंतर त्या तरुणीने जो व्हिडिओ टाकला तो मनात संतापजागृत करणारा आहे. राज्यात सध्या आरक्षणावरून वेगवेगळे समाज समोरासमोर येत आहेत, जाती-जातीमध्ये भांडणे सुरू झाली आहेत., असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
महत्त्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर कारवाई, 72 तासात प्लांट बंद करण्याच्या सूचना”
‘तुरूंगात असताना छगन भुजबळ शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे’; राष्ट्रवादी नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
“…या कारणामुळे भाजप खासदाराचा सरकारला घरचा आहेर”