आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
यवतमाळ : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकाल हा आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलासा मिळतो की ठाकरे गटाला दिलासा मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
या निकालाच्या आधीच आता ठाकरे गटाने, शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का बसला असून दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे.
ही बातमी पण वाचा : उध्दव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल; आता शिंदेंचा पलटवार, म्हणाले…
महाविकास आघाडीचे संजय देशमुख, माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन महाविकास आघाडीला 18 पैकी 14 जागी विजय मिळाला आहे. या निवडणुकीत फक्त 4 जागी संजय राठोड गटाचे संचालक निवडून आले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
राज ठाकरे म्हणाले, बाहेर देता, तसं, काकांकडेही लक्ष द्या, आता अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, विलंब करून चालणार नाही; शरद पवारांनी दिले बदलाचे संकेत
उद्धव ठाकरेंकडे उरलेले सर्व आमदार अमच्या संपर्कात; शिंदे गटातील ‘या’ मोठ्या नेत्याचा दावा