Home महाराष्ट्र “बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, ते कलेक्शन ऑफिस झालंय”

“बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, ते कलेक्शन ऑफिस झालंय”

मुंबई : मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही. मुंबई ही आमचीही आहे. त्यामुळे शिवसेना भवनसमोर कार्यालय उघडलं असेल तर बिघडलं कुठं?, असा सवाल करत  भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

भाजपच्या कार्यालयासमोर काय आहे याचा आम्हाला काय फरक पडतो? कोणतं भवन चवन असेल तर काय फरक पडतो? ते बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही. ते कलेक्शन ऑफिस झालं आहे. आम्हाला भवन फवनचा फरक पडत नाही, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही. मुंबई ही आमचीही आहे. आम्ही आमच्या निवडणुकीची तयारी असो कि कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम असो त्यासाठीची आमची ही तयारी आहे. मुंबईच्या सर्व वॉर्डात भाजपची ताकद वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेना प्रमुखांचा आम्ही नेहमीच आदर करतो; प्रसारमाध्यमांतून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल”

…तर सेना भवन फोडू; प्रसाद लाड यांचं वादग्रस्त वक्तव्य

“शिवसेनेत माज पाहिजेच, मग कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल”