Home महाराष्ट्र “शिवसेनेत माज पाहिजेच, मग कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल”

“शिवसेनेत माज पाहिजेच, मग कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल”

अहमदनगर : शिवसेनेत आहे म्हणजे माज, मस्ती पाहिजेच. मग कोणी माजोरडा म्हणो, गुंड म्हणो किंवा मवाली….हे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते अहमदनगरच्या एका सभेत बोलत होते. शिवसेना म्हणजे पॉवर, सत्ता. नरेंद्र मोदीसुद्धा समोरुन जाताना माझी विचारपूस करतात, असंही ते या सभेवेळी म्हणाले आहेत.

“शिवसेनेत माज असायलाच हवा. कुणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल. वाघासारखं जन्माला आलो, वाघासारखं मरणार, असं सांगतानाच शंकरराव गडाख सौम्य बोलतात. तुम्हीही हळूहळू डरकाळी फोडाल. सत्ता असो वा नसो शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांकडून कामे करून घ्या”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेत माज असायलाच पाहिजे. मग कोणी माजोरडा म्हणो गुंड म्हणो किंवा मवाली. मला कितीतरी जण म्हणतात की हा गुंड आहे मवाली आहे. बाळासाहेब पण म्हणायचे आमची मवाल्यांची संघटना आहे. आम्ही मवाली होतो म्हणून महाराष्ट्र टिकला, आम्ही मवाली होतो म्हणून 1992 साली हिंदुंचं रक्षण झालं, असंही संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

गडकरीसाहेब महाराष्ट्राला आपल्या मदतीची गरज- उद्धव ठाकरे

“रिकामटेकडे दौरा करतात की टीका करतात, हे महाराष्ट्राची जनता पाहतेय”

विरोधी पक्ष मोकळा आहे, डोकं रिकाम असतं, आरोप करतच असतात; संजय राऊतांचा टोला

कुठेही जा, तुमची ओळखही शिवसैनिक म्हणूनच; शिवसेनेचा नारायण राणेंना टोला