Home महाराष्ट्र आज बाळासाहेब हवे होते; राम मंदिर भूमिपूजनाआधी राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

आज बाळासाहेब हवे होते; राम मंदिर भूमिपूजनाआधी राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहीत तमाम हिंदू बांधवांचं अभिनंदन केलं आहे.

जवळपास 3 दशकांचा संघर्ष, शेकडो कारसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांच्या त्यागानंतर हा दिवस उजाडणार आहे. या क्षणी आपल्याला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते आहे, या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते. त्यांना मनापासून आनंद झाला असता, असं राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, नरेंद्र मोदी ह्यांच्या सरकारने जे प्रयत्न केले ते निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन, असं म्हणत राज ठाकरेंनी मोदी सरकारचे आभार मानले आहेत.

https://www.facebook.com/RajThackeray/posts/864138987450585

महत्वाच्या घडामोडी-

Tik-Tok अमेरिकेला विका, नाहीतर; डोनाल्ड ट्रम्प यांचा चिनी कंपनीला इशारा

सुशांतच्या आत्महत्येबाबत अमृता फडणवीसांचं आणखी एक ट्विट; म्हणाल्या…

सुशांतसिंह प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंनी सोडलं माैन; म्हणाले…

निरपराध मुलींवर अत्याचार करून त्यांचा खून करण्याचं या सरकारला लायसन्स दिलं नाही- नारायण राणे