Home महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंनी राणेंना शाप दिलाय, त्यामुळे राणेंची अधोगती सुरू आहे- भास्कर जाधव

बाळासाहेब ठाकरेंनी राणेंना शाप दिलाय, त्यामुळे राणेंची अधोगती सुरू आहे- भास्कर जाधव

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत थेट कानाखाली खेचण्याची भाषा केली होती. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या सर्व प्रकरणावर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सिद्धपुरुष होते. त्यांनी राणेंना शाप दिला होता. त्यामुळेच राणे काहीही बरळत आहेत, असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राणे असं का बडबडत आहेत? बाळासाहेब ठाकरे यांनी हयात असताना एका कामासाठी डॉ. जलील पारकर यांना फोन केला होता. पारकर अजून आहेत. त्यांच्या फोनवरूनच शिवसेनाप्रमुखांनी राणेंना दिलेला शाप होता., असं भास्कर जाधव म्हणाले.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे हे सिद्धपुरुष होते. ते जे बोलायचे, ते जे भविष्यवाणी करायचे, ती खरी व्हायची. बाळासाहेबांचं प्रत्येक वक्तव्य खरं ठरलेलं आहे. राणे केंद्रीय मंत्री होऊ द्या की, आणखी काही होऊ द्या, सिद्धपुरुष बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला त्यांना शाप आहे, त्यानुसार राणेंची अधोगती सुरू आहे, असा टोला भास्कर जाधवांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरतीकरुन शॉक दिला पाहिजे- गुलाबराव पाटील

“राणे-शिवसेना वाद वाढला! पुण्यात शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयात सोडल्या कोंबड्या”

उद्धव ठाकरे मोदींना ‘चोर’ म्हणाले होते, मग त्यांचं काय करायचं?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

मी शिवसेनेला घाबरत नाही; आमचं पण वरती सरकार पाहू सेना किती उडी मारते- नारायण राणे