मुंबई : लॉकडाउनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम अभिनेता सोनू सूद याने केलं, यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या ‘सामना’मधील लेखातून सोनूच्या सूदच्या या बचावकार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.
सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातील काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकारला’ अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते. सोनू सूद हा महाबली, बाहुबली किंवा सुपरहिरो आहे, असं चित्र रंगवण्यात हे राजकीय पक्ष काही प्रमाणात झाले, असं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.
भाजपातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले. व त्याला पुढे करत उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे ‘महात्मा’ सोनू सूद याने दाखवून दिले, अशी खोचक टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने कोरोनासारख्या प्रभावी रोगाचा मुकाबला केला”
आईचा चिमुकलीला दम; मुख्यमंत्र्यांचा थेट वडिलांना फोन, म्हणाले… आमच्या शिवसैनिकांना का त्रास देता?
… आणि ट्रोल करणाऱ्यांना बंगल्यावर नेऊन झोडणारे पहिले मंत्रीही तुम्हीच- अतुल भातखळकर
उद्धव ठाकरे लोकप्रिय वाटत असतील तर ते चांगलंच आहे, पण… फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया