शरद पवारांऐवजी मोदींचं वय विचारावं, नाना पटोलेंच्या आव्हानाला, अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

0
212

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं वय विचारण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वय विचारावे, अशी टीका नाना पटोलेंनी केली होती. याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आपल्या सगळ्यांचं वय होणार आहे. जेंव्हा मोदींचं वय होईल, तेंव्हा विचारू. आमचं आम्ही बघू… बाकीच्यांनी नाक खुपसण्याचं कारण नाही., असं म्हणत अजित पवारांनी नाना पटोलेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

ही बातमी पण वाचा : “ब्रेकींज न्यूज ! गुजरातमध्ये मोठी दुर्घटना, बोट उलटून 6 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू”

नाना तू किती पक्ष फिरून आला आम्हाला माहिती आहे, असा एकेरी उल्लेख अजित पवारांनी यावेळी केला. ते मुंबईत महिला निर्धार मेळाव्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

काय म्हणाले होते नाना पटोले?

दरम्यान, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची भाजपनं मांजरीसारखी अवस्था करून ठेवली आहे. अजित पवारांनी शरद पवार यांचं वय विचारण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वय विचारलं पाहिजे. मग अजित पवारांची हिंमत दिसेल, असं आव्हान नाना पटोलेंनी दिलं होतं.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मोठी बातमी! सुशीलकुमार शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का; ठाकरे गटातील या नेत्याला अटक

बाळासाहेब असते तर…; एकनाथ शिंदेंचा उध्दव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here