Home महाराष्ट्र भाजपात गेलेल्या अशोक चव्हाण यांची काँग्रेसवर टीका,म्हणाले…

भाजपात गेलेल्या अशोक चव्हाण यांची काँग्रेसवर टीका,म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

इंडिया आघाडीची आज दिल्लीतील रामलीला मैदानात सभा पार पडली. या सभेला देशभरातील इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. यावरून काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले राज्यसभेचे नवोदित खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

ही बातमी पण वाचा : मनसे महायुतीत सहभागी होणार का?; ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

राज्यातील विद्यमान नेतृत्वामुळे काँग्रेसची फरफट सुरू आहे. काँग्रेसच जे महत्त्व एकेकाळी होतं ते राहिलं नाही. काँग्रेसला कुणी विचारायला तयार नाही”, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मान दिला जात नाही.  वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा मविआने सन्मान केला नाही. काँग्रेसच्या आधीच इतर पक्ष जागा जाहीर करत आहेत,असंही अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

 भाजपला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता ठाकरेंच्या वाटेवर?

शिंदे गटाचा काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसच्या ‘या’ आमदाराचा राजीनामा

गोपाळकृष्ण शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार