भाजपचा काँगेस – राष्ट्रवादीला मोठा धक्का; दिग्गज नेत्यांसह तब्बल 700 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
186

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजपने काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांसह तब्बल 700 कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

हे ही वाचा : “शिंदेंचा आता मनसेला दणका; राज ठाकरेंच्या ‘या’ निष्ठावान नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

राज्यातल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. यात काँग्रेसचे वाशिमचे माजी खासदार अनंतराव देशमुख, नाशिकचे राष्ट्रवादीचे माजी खासदार वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार, शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांच्यासह कोल्हापूरचे माजी मंत्री बाबासाहेब कुपेकर यांचे बंधू बाळासाहेब कुपेकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पाडला.

महत्त्वाच्या घडामोडी –

…म्हणून मी त्यावेळी डोळा मारला; अखेर अजित पवारांनी केला खुलासा

उध्दव ठाकरेंना मोठा धक्का; ठाकरे गटातील ‘या’ मोठ्या नेत्याच्या पुत्राने केला शिंदे गटात प्रवेश

शिवसेनेत दोन गट पाडणं, हे भाजपचच मिशन; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here