आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मोठ्या राजकीय घडामोडीनंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला. मात्र या मंत्रिमंडळात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा समावेश करण्यात आला नाही.मंत्रीमंडळाच्या विस्तारनंतर पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. मात्र आज पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.
ज्यावेळी मंत्रिमंडळ तयार केले जाते त्यावेळी सर्वांचे समाधान करणे शक्य नसते. त्यामुळे जे मंत्री झाले त्यांनी समाधान मानावे, अशा शुभेच्छा मी नव्या मंत्र्यांना देत आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
हे ही वाचा : आतापर्यंत मी शांत होतो, पण…; पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी, मंत्री संजय राठोड यांचा इशारा
मी चर्चेत राहणारच नाव आहे, मात्र माझी पात्रता वाटत नसेल म्हणून पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मला मंत्रीपद दिले नसेल. जेव्हा त्यांना माझी पात्रता वाटेल तेव्हा कदाचित देतीलही. मात्र मला मंत्रिपदाची अपेक्षा नाही. मी नाराज असल्याच्या चर्चा माध्यमातून होतात आणि कार्यकर्त्यातून होतात, असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, नव्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटातील 9 तर भाजपच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
महत्त्वाच्या घडामोडी –
…म्हणून संजय राठोड यांचा मंत्रीमंडळात समावेश केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खुलासा
मुतायचे लय वांदे हायेत म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला संजय शिरसाट यांचं भन्नाट उत्तर, म्हणाले…
राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…