Home महाराष्ट्र ईडीची भिती दाखवता काय?; पण लक्षात ठेवा, आम्ही…; गुलाबराव पाटलांचा भाजपला इशारा

ईडीची भिती दाखवता काय?; पण लक्षात ठेवा, आम्ही…; गुलाबराव पाटलांचा भाजपला इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा (ईडीच्या) सूरू असलेल्या कारवाईवरून शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाष्य करत भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजपमधील काही बांडगुळे रोज बेछूट गरळ ओकतात. आता त्यांना धडा शिकवण्याची खरी वेळ आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखविता काय? पण लक्षात ठेवा, आम्हीही बांगड्या घालून स्वस्थ बसलेलो नाही, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिला. शिवसेनेच्या वतीने नेवासा तालुक्यातील सोनई येथे शिवसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

हे ही वाचा : राणेंना शिवसेनेचा पुन्हा दणका; कुडाळ नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला; विजयानंतर शिवसैनिकांनी केला कोंबडा डान्स

दरम्यान, कोरोनाकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केल्यानेच पहिल्या पाचमध्ये राज्याचे नाव आहे. चांगल्या कामाला भाजपची लागलेली साडेसाती हटू दे, अशी शनिदेवाला प्रार्थना केल्याचं गुलाबराव पाटलांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“वर्ध्यात राष्ट्रवादीचा मनसेला दणका, तब्बल ‘इतक्या’ पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ”

शाळेत जाताना शाळेचा गणवेशच हवा, उद्या कोणीही उठून काहीही करेल- तृप्ती देसाई

हिंदूहृदयसम्राट राज साहेब ठाकरे यांचा विजय असो; घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी