आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. 40 आमदारांनंतर आता शिवसेनेच्या 12 खासदार शिंदे गटात सामील झाले. आता अशातच कोल्हापूरचा आणखी एक आमदार शिंदे गटात सामील झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेचे माजी आमदार सुजित मिणचेकर हे शिंदे गटात सामील होणार असल्याचं समोर येत आहे. सुजित मिणचेकर यांनी खासदार धैर्यशील माने यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी सुजित मिणचेकर यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांची विचारपूस केली असल्याचंही मिणचेकर यांनी सांगितलं.
हे ही वाचा : “अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा”
दरम्यान, कोल्हापूरातील खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार राजेश क्षीरसागर हे या आधीच शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. त्यानंतर आता माजी आमदार सुजित मिणचेकरही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिवसेना जेव्हा फुटली तेव्हा राज ठाकरेही त्याला कारणीभूत होते; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा आरोप
एकनाथ शिंदेंनी माझा कायम सन्मानच केला; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्या कडून कौतुक