वॉशिंग्टन : कोरोनानं संपूर्ण जगात थैमान घातलं असून अमेरिकेमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 48 हजारहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्यात अमेरिकेत आता आणखी एक आजार वेगाने पसरत आहे. अमेरिकेतील 11 राज्यांतील 640 हून अधिक लोकांना सायक्सोस्पोरा नावाचा हा आजार झाला आहे.
सायक्सोस्पोरा हा आजार पॅकेटमध्ये विकल्या जाणाऱ्या सॅलडमुळे होतो. पॅकेट सॅलडमध्ये आइसबर्ग लेटस, कोभी आणि गाजर असतात. हे सॅलड खाल्यानंतर तब्बल 641 जणांना या विचित्र आजाराची लागण झाली आहे. यातील 37 जणांना रुग्णालयात दाखलही करण्यात आलं आहे.
सूक्ष्म परजीवींशी संबंधित हा सायक्लोस्पोरियासिस रोगाची भूक न लागणे, पोट फुगणे, मळमळ, सौम्य ताप, थकवा आणि अतिसार अशी लक्षणं आहेत. ही लक्षणं साधारणत: पॅकेटमधील अन्न किंवा पाणी प्यायल्यानंतर एका आठवड्यांनी दिसतात.
दरम्यान, ज्या सॅलडमुळे हा आजार पसरला ती उत्पादने इलिनॉयच्या स्ट्रीमवुडमधील फ्रेश एक्सप्रेस या कंपनीने केली होती.
महत्वाच्या घडामोडी-
…म्हणून मी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला- उद्धव ठाकरे
“फडणवीसांना अमित शाह म्हणजे आदेश बांदेकर वाटले असतील”
…अन् जिगरबाज कॅप्टन विक्रम बत्रांनी सहकाऱ्यांसह पॉईंटवर तिरंगा फडकावला
धक्कादायक! सांगलीत पोलिसांसमोरच उद्ध्वस्त केला कंटेनमेंट झोन