Home महाराष्ट्र धक्कादायक! सांगलीत पोलिसांसमोरच उद्ध्वस्त केला कंटेनमेंट झोन

धक्कादायक! सांगलीत पोलिसांसमोरच उद्ध्वस्त केला कंटेनमेंट झोन

सांगली : अँटीजेन टेस्टद्वारे तपासणी केलेल्या नागरिकांपैकी 23 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी शहरातील इंदिरानगर परिसर सील केला होता. मात्र, संपूर्ण इंदिरानगर सील झाल्याने नागरिकांनी याला जोरदार विरोध केला.

शनिवारी संतप्त नागरिकांनी बॅरिकेट्स आणि पत्रे काढून कंटेनमेंट झोन उद्ध्वस्त केला. याशिवाय वैद्यकीय तपासणीलाही नागरिकांकडून विरोध सुरू आहे. नागरिकांच्या उद्रेकानंतर पोलिसांनी इंदिरानगर परिसरातील बंदोबस्त वाढवला आहे.

दरम्यान, संपूर्ण इंदिरानगर सील करण्याऐवजी ज्या गल्लीत रुग्ण आढळले आहेत तेवढीच गल्ली सील करावी, असा या परिसरातील नागरिकांचा आग्रह आहे. एकाच वेळी 23 रुग्ण आढळल्याने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाने परिसरातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी सुरू केली आहे. मात्र, अनेकांना करोना संसर्गाची कोणतीही लक्षणे नसतानाही अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याच्या तक्रारी सुरू आहेत. यामुळे नागरिकांकडून वैद्यकीय तपासणीला विरोध सुरू आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“माझं सर्वात मोठं ऑब्जेक्शन आहे, माझं वय 80 आहे, तुम्ही 85 का म्हणता”

आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव कॅप्टन मुंबईत बसून नियंत्रण ठेवत आहेत- शरद पवार

शरद पवारांचं खाजगी डॉक्टरांना इंजेक्शन; म्हणाले…

…तर आरोग्य विभागात मुलाखतीशिवाय…; राजेश टोपेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा