Home महाराष्ट्र …म्हणून मी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला- उद्धव ठाकरे

…म्हणून मी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला- उद्धव ठाकरे

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना-भाजपा युती तटली आणि शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशा तीन पक्षांचं एकत्रित महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे.

ज्या एका उद्देशाने भाजपासोबत गेलो होतो त्यात पोकळपणा असल्याची जाणीव झाली, म्हणून मी आघाडी करण्याचा निर्णय घेतला, असं उद्ध ठाकरेंनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

दरम्यान, ध्यानीमनी नसता मी मुख्यमंत्री झालो. नाहीतर माझ्या स्वप्नातही ही संधी मला मिळेल असं वाटलं नव्हतं. पण आता माझ्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आलीच आहे तर माझ्या जनतेची स्वप्नं पूर्ण करणारच,” असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“फडणवीसांना अमित शाह म्हणजे आदेश बांदेकर वाटले असतील”

…अन् जिगरबाज कॅप्टन विक्रम बत्रांनी सहकाऱ्यांसह पॉईंटवर तिरंगा फडकावला

धक्कादायक! सांगलीत पोलिसांसमोरच उद्ध्वस्त केला कंटेनमेंट झोन

“माझं सर्वात मोठं ऑब्जेक्शन आहे, माझं वय 80 आहे, तुम्ही 85 का म्हणता”