बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पवार यांच्यासह या दौऱ्यात बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जवळपास अडीच तास बैठक पार पडली. ही बैठक सुरु असतानाच एका तरुणाने अजित पवारांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन हा तरुण अजित पवारांची भेट घेऊ इच्छित होता.
अजित पवार जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. त्यावेळी हनुमान फफाळ या तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करत अजित पवारांना भेटण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं. पोलिसांनी संबंधित तरुणाला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून बाहेर काढलं. त्यावेळी या तरुणाने घोषणाबाजीला सुरुवात केली.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा या तरुणाने दिल्या. त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
महत्वाच्या घडामोडी –
…तर राज्यात निवडणुका होऊ देणार नाही; पंकजा मुंडेंचा सरकारला इशारा
मुंबईकरांवर कराचा बोजा लादलात, तर काँग्रेस पक्ष आडवा येईल- भाई जगताप
शिवस्मारकाचं काम लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरू; विनायक मेटेंचा सरकारला इशारा
WTC Final! न्यूझीलंडविरूद्धच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा, ‘अशी’ असेल उद्याची प्लेइंग-11