मविआ सरकारच्या काळात, फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला, पण…; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा गाैफ्यस्फोट

0
262

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात माध्यमांशी बोलताना, एक मोठा गाैफ्यस्फोट केला आहे.

मविआ सरकारच्या काळात, देवेंद्र फडणवीस यांना गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला., असा मोठा गाैफ्यस्फोट एकनाथ शिंदेंनी यावेळी केला.

मविआ सरकार असताना गिरीश महाजन, नवनीत राणा, कंगना राणौत, नारायण राणे यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले होते. त्यांना जेलमध्ये डांबण्याचा प्रयत्न केला. सत्तेचा आणि यंत्रणांचा दुरूपयोग महाविकास आघाडीचं सरकार असताना झाला., असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : …म्हणून आत्तापर्यंत मनसेशी युती केली नाही; उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण

मलाही काही गोष्टी माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनाही गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला. पण, सीबीआयाने ‘दूध का दूध’, ‘पाणी का पाणी’ केलं आहे. सत्तेचा दुरुपयोग कोण करत होतं? आणि कोण कोणावर आरोप करतंय, याचा विचार जनता करत आहे. योग्यवेळी विरोधकांना उत्तर दिल जाईल,, असा इशारा मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी दिला.

महत्त्वाच्या घडामोडी –

शरद पवार यांचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर; म्हणाले, केंद्र सरकारने…

“पवार काका-पुतण्यांमुळे डोकं फुटायची वेळ येईल; ‘या’ आमदाराचं विधान चर्चेत”

“सांगलीत, काँग्रेसकडून उमेदवार ठरला, भाजपमध्ये उमेदवार बदलाचे संकेत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here