आदित्य ठाकरेंनी केलेल्या टिकेवर अमृता फडणवीसांच प्रत्यृत्तर, म्हणतात…

0
1336

मुंबई: कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली होती. यावर अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंच्या ट्विटला प्रत्यृत्तर करत आदित्य ठाकरेंना घरणेशाहीवरुन टोला लगावला आहे.

कोषामध्ये राहणाऱ्या अळीला आयुष्यातील मजा कधीच कळणार नाही. आदित्य ठाकरे, तुमच्या पूर्वजांनी आरामात विणलेल्या रेश्माच्या जीवावर वैभवात राहून भरभराट झाल्यासारखं तुमचं आयुष्य आहे, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीस तुमच्या संघर्षाचा मला अभिमान आहे. भाजपाच्या प्रत्येक कष्टकरी सदस्याचाही मला अभिमान आहे,” असंही अमृता यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसजी मी सहसा  प्रत्युत्तर देत नाही. पण सर्वात शक्तीशाली महिलांनी बांगड्या परिधान केल्या आहेत. त्यामुळे कृपया तुम्ही बांगड्याबाबतच्या वक्तव्याबाबत माफी मागावी. राजकारण चालूच राहील, पण ही मानसिकता बदलायला हवी. असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं होतं.

महत्वाच्या घडामोडी-

ठाकरे सरकारचा नवीन निर्णय; आता महिलांचा लैंगिक छळ, बलात्कार केल्यास थेट फाशी

“सावरकरांना भारतरत्न मिळावं म्हणून आपण सर्वजण प्रयत्न करुया”

शिवसेनेनं आपलं हिंदुत्व सोडलं आहे का?, देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला सवाल

देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचा पलटवार, म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here