आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा सिनेमा काल 25 जानेवारीला रिलीज झाला असून सध्या बाॅक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. मात्र, पठाण सिनेमामुळे मराठी सिनेमे अडचणीत आले आहेत. यावर आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी थिएटर मालकांना इशारा दिला आहे.
पठाणमुळे मराठी चित्रपटांना शोज मिळत नसल्याची तक्रार मनसेनं केली आहे. मल्टिप्लेक्समध्ये पठाणसोबतच मराठी चित्रपटांचेही शोज लावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा अमेय खोपकर यांनी थिएटर मालकांना दिला आहे.
हे ही वाचा : आंबेडकरांना महाविकास आघाडीचा भाग व्हायचा असेल तर…; संजय राऊतांचा, प्रकाश आंबेडकरांना सल्ला
आमचा पठाणला विरोध नाही, शाहरुखचा कमबॅक चित्रपट आहे. मागच्या एक महिन्यापासून रितेश देशमुखचा ‘वेड’हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. वाळवी सिनेमानेदेखील दुसऱ्या आठवड्यात चांगली कमाई केली. त्यानंतर बांबू आणि पिकोलो सिनेमा रिलीज झाला. यातल्या एकाही सिनेमाला चांगले मल्टिप्लेक्स, स्क्रिन्स किंवा थिएटर्स मिळत नाही. मी या गोष्टीचा निषेध करतो. मल्टिप्लेक्स वाल्यांनी मराठी सिनेमांना चांगले थिएटर्स आणि मल्टिप्लेक्स दिले नाही तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू. आम्ही बघून घेऊ की, कसे मराठी सिनेमांचे थिएटर्स मिळत नाहीत., असा इशारा अमेय खोपकरांनी यावेळी दिला.
दरम्यान, महाराष्ट्रात मराठी सिनेमे लावा, या विषयावरून आंदोलन करणे ही शरमेची बाब आहे. , असंही अमेय खोपकर म्हणाले. तसेच वेड आणि वाळवी यांसारख्या सिनेमांनी सिद्ध केले की, मराठी सिनेमेसुद्धा चालतात. इतर सिनेमांना सिद्ध करायला संधी तरी द्या. महाराष्ट्रात मराठी सिनेमांसाठी भीक मागावी लागते. मल्टिप्लेक्सवाल्यांची ही मुजोरी आहे. मी लवकरच मुख्यमंत्री आणि सुधीर मुनगंटीवार यांचीही भेट घेऊन त्यांच्यापुढे ही समस्या मांडणार आहे., असंही अमेय खोपकर म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
औरंगाबादमध्ये शिंदे गट-ठाकरे गटाचे नेते एकाच मंचावर एकत्र?; राजकीय चर्चांना उधाण
उध्दव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा होणार ठाकरे गटात प्रवेश
मोठी बातमी! ‘या’ निवडणुकीसाठी भाजप-राष्ट्रवादी आले एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण