आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सातारा : आगामी सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी या निवडणुकीसाठी मोठी रणनीती आखली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही या निवडणुकीसाठी मोठी मोर्चेबांधणी केली आहे.
उदयनराजे भोसले यांचे स्वप्न भंग करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा डाव टाकत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना सोबत घेऊन उदयनराजेंचे मनसुबे उधळण्याची संपूर्ण तयारी केली आहे.
शिवेंद्रराजेंकडे जिल्हा बँकेतील 22 टक्के मते असल्याने त्यांना सातारा सोसायटीसह आणखी चार जागा हव्या आहेत. तर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनाही कराड सोसायटीसह चार जागा हव्या आहेत. त्यामुळे दोघांच्या मागणीवर अर्ज दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार मार्ग काढणार आहेत. तर दुसरीकडे खासदार उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीने उमेदवाराचे नाव निश्चित केले आहे.
हे ही वाचा : राज ठाकरेंना कोरोना, पण अमित ठाकरे अॅक्शन मोडमध्ये; पाच शाखांचे करणार उद्घाटन
दरम्यान, उमेदवाराचे नाव मात्र गुलदस्त्यात ठेवलं असून उद्या अर्ज दाखल केल्यानंतरच त्याचे नावे उघड होणार आहेत. त्यामुळे खासदार उदयनराजेंना या निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महत्वाच्या घडामोडी –
माझ्यामागे ED लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार आहे; भाजपच्या आणखी एक नेत्याचं मोठं वक्तव्य
शाहरूख खानने भाजपमध्ये प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं असं सांगतील; भुजबळांचा टोला
हिंमत असेल तर मैदानात येऊन दाखवा; चंद्रकांत खैरेंचं इम्तियाज जलील यांना आव्हान