अजित पवार स्वत:च्या मुलाला निवडूण आणू शकले नाहीत; राज ठाकरेंचा टोला

0
383

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : झी मराठी या वाहिनीवर ‘खुपते तिथे गुप्ते’ या बहुचर्चित शोचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे ‘खुपते तिथे गुप्ते’ शोमध्ये हजेरी लावणार आहेत.

‘खुपते तिथे गुप्ते’ या शोचा प्रोमो व्हिडीओ नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. झी मराठीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवारांवर जोरदार फटाकेबाजी करताना दिसत आहेत.

ही बातमी पण वाचा : निवडणूकीत देवाला आणलं, तरी पराभव झाला, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा भाजपला टोला

राज ठाकरेंना अजित पवारांचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. ‘एकदा इलेक्शनमधून बाहेर पडल्यावर 14 आमदार निवडूण आणले. की सगळे लोक त्यांच्यापासून दूर गेलेले, असं अजित पवार व्हिडीओत म्हणत आहेत. यावर राज ठाकरे अजित पवारांची मिमिक्री करत ‘ए गप रे…असे मी म्हणणार होतो, असे उत्तर देतात.

‘अजित पवार स्वत:च्या मुलाला निवडूण आणू शकले नाहीत. बारामतीत काकांनी हात बाजूला केला, तर यांचं तरी काय होईल,’ असे म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांना टोला लगावला.

महत्त्वाच्या घडामोडी – 

तब्बल 9 तासांनंतर ईडी कार्यालयाबाहेर येताच, जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

लोकशाही मान्य नसलेला पक्ष म्हणजे भाजप; नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात

समीर वानखेडे प्रकरणावर पहिल्यांदाच सुप्रिया सुळे बोलल्या, म्हणाल्या, लोकांच्या घरात घुसून बायका पोरांवर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here