आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उकरून काढल्यानंतर, राज्यातल्या राजकारणातील वातावरन तापलं आहे. अशातच या वादात आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उडी मारली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्रीबाहेर आपण हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं राणा दाम्पत्यांनी गुरुवारी जाहीर केलं होतं. त्यासाठी शुक्रवारी ते मुंबईत दाखल देखील झाले आणि सकाळी 9 वाजता कसल्याही परिस्थितीत आपण मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं राणा दाम्पत्यांनी म्हटलं आहे. यानंतर राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिकांनी जोरदार फिल्डिंग लावली. तर पोलिसांनी राणा दांपत्याला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी अटक केली. यानंतर राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्ष आवाहन दिलं होतं. यावरून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
हे ही वाचा : “भाजपची यशस्वी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ”
साधु संत येती घरा तोच दिवाळी दसरा अशी म्हण आहे. पण आमच्या घरात दिवाळी असो, दसरा असो किंवा नसो साधु संत येतच असतात. शिवसेनाप्रमुख, माँसाहेब असतानाही येत होते, आताही येतात. पण ते नीट बोलून सांगून येतात. पण दादागिरी करुन याल तर दादागिरी कशी मोडून काढायची हे शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाच्या व्याखेत समजावून सांगितलं आहे,
दरम्यान, प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी आणि तिकीट, पास काढताना रोख रक्कमेचा व्यवहार टाळता यावा, यासाठी ‘एकच सामायिक कार्ड’ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) सुविधेचे लोकार्पण काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
असं कुठं असतं का किरीटजी?; स्वतःच नखाने मारून रक्त काढता, आणि मग नंतर…; रूपाली पाटलांचा घणाघात
शिंदे आजींच्या भेटीवरुन मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले…
जबाबदार पदावर असणाऱ्यांनी…; मुंबई हायकोर्टाने राणा दांपत्याला सुनावलं