आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानं राष्ट्रवादीत 2 गट पडले आहेत. एक शरद पवार गट तर दुसरा अजित पवार गट. त्यानंतर राष्ट्रवादीतील अनेक आमदारांचा अजित पवार गटाकडे जाण्याचा कल वाढला.
यानंतर शरद पवार आता मैदानात उतरले असून, पक्षाच्या मोर्चेबांधणीला सूरूवात केली आहे. अशातच आता पवारांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. कोल्हापूरातील एका मोठ्या नेत्यानं शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे अनेक राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.
ही बातमी पण वाचा : नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर आता कन्या मानसी देसाईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, चुकीची माहिती…
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील भाजप नेते सुरेश घाडगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. घाडगे यांच्या पक्षप्रवेशानंतर शरद पवार गट मजबूत झाला असल्याचं म्हटलं जात आहे. पक्षप्रवेश केल्यानंतर घाडगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
सत्तेत असताना मजा करायची आणि नंतर साथ सोडून द्यायची, ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. म्हणून मी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मी आमच्या तालुक्यात अनेक विकास कामं करणार आहे., असं घाडगे म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! ‘… या’ कारणामुळे सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमनेसामने
“मोठी बातमी! नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात ‘या’ व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल”