“नाराजींच्या चर्चानंतर आता स्वत: वसंत मोरे राज ठाकरेंच्या भेटीस, पुण्यातील निवासस्थानी मोरे-ठाकरेंमध्ये खलबतं, चर्चांना उधाण”

0
689

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना काही दिवसांपूर्वी तंबी दिली होती. थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, अशा शब्दांत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना तंबी दिली होती.

राज ठाकरेंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पत्र पोस्ट केलं होतं, यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना वादग्रस्त वक्तव्य न करण्याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा इशारा पुण्याचे मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनाच असल्याच्या चर्चा सूरू झाल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज स्वत: वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची पुण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा : …जर मंत्रीमंडळ विस्तार होणार नसेल, तर…; बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्याकडून पुण्यात मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यासाठी राज ठाकरे हे स्वत: लक्ष देत आहेत. अशातच वसंत मोरे यांनी स्वत: राज ठाकरे यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेत नाराजीच्या चर्चांवर पडदा टाकला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! आमदार योगेश कदम यांचा अपघात, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, म्हणाले…

प्राजक्तराज; अभिनेत्री प्राजक्ता माळीने सूरू केला ज्वेलरी ब्रँड, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची विशेष उपस्थिती, म्हणाले…

“काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता भाजपच्या वाटेवर?; पटोलेंच्या कार्यक्रमाला गैरहजर, फडणवीसांच्या कार्यक्रमाला उपस्थिती; चर्चांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here