आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातून मनसे कार्यकर्त्यांनी राजापूर टोलनाक्यावर तोडफोड केली आहे.
मनसे कार्यकर्त्यांनी आज संध्याकाळी साडेपाच वाजता राजापूर टोलनाक्यावर तोडफोड केली. टोल फोडणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
ही बातमी पण वाचा : निवडणूक आयोगाची शरद पवार-अजित पवार गटाला नोटीस; राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचं?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच पनवेल येथे एक सभा पार पडली. त्या सभेत त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावर असणाऱ्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर तयार व्हावा, यासाठी राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका मांडली होती. त्यानंतर एक मोठं जनआंदोलन करण्यात यावं, असं आवाहन मनसैनिकांकडून करण्यात आलं. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जनआंदोलने केली.
महत्त्वाच्या घडामोडी –
अजित पवारांवरील ‘त्या’ टीकेवरून, अमोल मिटकरींचा, राज ठाकरेंना टोला, म्हणाले…
“पक्षफुटीवर, जयंत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, अजित पवार आमच्याच पक्षात, मात्र…”
‘ईडी’च्या कारवायांमुळे आमचे लोक भाजपमध्ये गेले; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट