आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
शपथविधी झाल्यानंतर 2 आठवड्यांनी आज अखेर खातेवाटप झालं आहे. या खातेवाटपात नवनियुक्त मंत्र्यांना काही खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवारांकडे अर्थ खातं देण्यात आलं आहे.
अजित पवार निधी देत नाहीत, त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो, असा दावा शिंदे गटाच्या आमदारांनी केला होता. मात्र आता अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर अजित पवारांकडेच अर्थमंत्रीपद देण्यात आलं आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : “बंडानंतर पहिल्यांदाच अजित पवार, शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल, चर्चांना उधाण”
शिंदे गटातील आमदारांच्या जखमेवर मीठ चोळून अर्थखातं अजित पवारांकडे दिलं, असा टोला एकनाथ खडसेंनी यावेळी लगावला. ते जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे आमदार गेले होते. त्यांचा अजित पवारांवर आक्षेप होता. अजित पवार अर्थमंत्री असताना निधी देत नाहीत, त्यामुळे आमच्यावर अन्याय होतोय, असा आक्षेप शिंदे गटाच्या आमदारांचा होता. पण आता अजित पवारांकडेच अर्थखातं आलं आहे. मला वाटतं की एकनाथ शिंदे गटाचे जे आमदार अजित पवारांवर नाराज होते, या नाराज आमदारांच्या जखमेवर मीठ चोळून हे खातं अजित पवारांकडे दिल्याचं दिसतं आहे., असा टोला एकनाथ खडसेंनी यावेळी शिंदे गटाला लगावला.
महत्त्वाच्या घडामोडी –
अखेर वाटप जाहीर; मंत्रिमंडळात कुणाला मिळालं कोणतं मंत्रीपद?; वाचा सविस्तर
“देवेंद्र फडणवीस राजकारणात सक्रिय झाल्यापासून राज्यात किळसवानं राजकारण सुरू झालं”
“खेडमध्ये राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा, म्हणाले, कुणाशी युती नको, कुणाशी भानगड नको”