उपमुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; चर्चांना उधाण

0
294

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 व अपक्ष 10 आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. मनसे आमदार राजू पाटील यांना मंत्रीमंडळात भाजपकडून मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे., त्यामुळेच फडणवीसांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असल्याचं म्हटलं जात आहे.

हे ही वाचा : मंगळवेढामध्ये भाजपला मोठा धक्का; ‘या’ निवडणूकीत समविचारी गटानं केली सत्ता स्थापन

दरम्यान, शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत आलं, त्यावेळी राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे राज ठाकरे यांनी पत्राद्वारे फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. त्यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, तुम्ही दिलेल्या शुभेच्छांना स्वीकारून आम्ही स्वतः तुमच्या भेटीला येणार आहोत. याच पार्श्वभूमीवर आज फडणवीसांनी राज ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेतली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मंगळवेढामध्ये भाजपला मोठा धक्का; ‘या’ निवडणूकीत समविचारी गटानं केली सत्ता स्थापन

मातोश्रीचे पूर्वीचे वजन संपलं आणि याला सर्वस्वी उद्धव ठाकरे जबाबदार; मनसेची टीका

शरद पवारांनी शिवसेना फोडली म्हणणाऱ्या दीपक केसरकरांना अजित पवारांचं जोरदार उत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here