“एकनाथ खडसे यांचा जळगावकडे परतत असताना अपघात”

0
296

जळगाव : अमळनेर येथून जळगावकडे परत जात असताना राष्टवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या खाजगी वाहनाचे टायर फुडून अपघात झाल्याची माहिती धरणगाव-जऴगाव महामार्गावर घडली. सुदैवाने कोणालाही काहीही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळालेली आहे.

अमळनेर येथे विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज जिल्हा दाैऱ्यावर होते. या कार्यक्रमासाठी एकनाथ खडसे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रम आटोपून एकनाथ खडसे हे त्यांच्या खाजगी वाहनाने क्र.एम.एच.19.सी.ई.19 ने जळगावकडे परतत होते. या दरम्यान त्यांच्या वाहनाचे टायर फुटले.

दरम्यान, चालकाने प्रसंगावधान राखत गाडीवर नियंत्रण मिळविले आणि गाडी थांबविली. सुदैवाने एकनाथ खडसे हे बचावले. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहन जागेवरच उभे करून एकनाथ खडसे दुसऱ्या वाहनाने जळगावकडे रवाना झाले.

महत्वाच्या घडामोडी-

तुमचा उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपण्याआधी बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफांचे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

महाविकास आघाडीने फेव्हीकॉल तयार केलाय, चिकटवून ठेवलं तरी काही केल्या तुटत नाही- चंद्रकांत पाटील

“सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त कंगना रणौतची महात्मा गांधी-पंडीत जवाहरलाल नेहरूंवर टीका”

वृद्धिमान साहा-जेसन होल्डरची शानदार फलंदाजी; हैदराबादची बेंगलोरवर 5 विकेट्सनी मात

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here