“शरद पवारांनी अचानक राजीनामा देणं हे…”; अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य

0
265

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी राजीनामा देणार असल्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला. या निर्णयावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं असं अचानक निवृत्ती घेणं खटकणारी बाब आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ही बातमी पण वाचा : शरद पवार यांचा राजीनामा; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“राष्ट्रवादीच्या भूमिकेवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. पण शरद पवारांसारख्या अनुभवी ज्येष्ठ नेत्याने अशाप्रकारे अचानक राजीनामा देणं, ही निश्चित खटकणारी बाब आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

विशेषत: केंद्रीय पातळीवर सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन आगामी काळात भाजपाविरोधात आघाडी उभी करत असताना शरद पवारांची निवृत्ती घेणं, ही न पटणारी बाब आहे. त्यांनी असं करायला नको होतं, अशीच आमची भावना आहे, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मी राष्ट्रवादी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे”; शरद पवारांची मोठी घोषणा

RCB कडून अनुष्का शर्माला स्पेशल बर्थडे गिप्ट; निर्णायक सामन्यात RCB चा लखनाैवर 18 धावांनी विजय

…आता आपण लवकरच सत्तेत असू; मनसे नेते अमित ठाकरेंचं मोठं विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here