आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरुन सुरु झालेल्या वादामध्ये अडकलेले अमली पदार्थ तपास यंत्रणेचे अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आणि वडीलांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. यावर अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
’नेत्यांना भेटले तो त्यांचा अधिकार आहे. यापूर्वीही ते अनेक नेत्यांना, दलित नेत्यांना भेटले आहेत. आठवले साहेब त्यांच्यासोबत आहेत. ते दलितांचा हक्क हिरावून घेत आहेत आणि दलित नेते त्यांच्यासोबत आहेत याहून दूर्देवी काही असू शकत नाही’, असं नवाब मलिकांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : शिवसेने नंतर आता राष्ट्रवादीचा भाजपला धक्का; माथेरानचा ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीत
हा सर्व विषय सामाजिक न्याय विभागाशी संबंधित आहेत. मी पत्राद्वारे यासंदर्भातील तक्रार करणार आहे. मी एकटाच तक्रार करणार नाहीय. बरेच लोक पोलीस स्थानकांमध्ये जात आहेत. तक्रार होणार हे निश्चित, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
दरम्यान, आमच्या म्हणण्याने तुम्ही निष्कर्षापर्यंत जाऊ नका. जात पडताळणी समिती आहे. खोटं जातप्रमाणपत्र दाखवून यांनी नोकरी मिळवली नसती तर गरीब होतकरु, दलित मुलगा किंवा मुलगी ती या पदावर बसली असती. नावाचा खेळ केला आहे. दाऊद वानखेडे की ज्ञानदेव वानखेडे?, यास्मिन की जस्मीन?, काशीफ खान की काशीफ मलिक खान? या चित्रपटामध्ये नावांचा खेळही फार मोठा आहे. मात्र नाव बदलून तो मी नव्हे असं सांगून चालणार नाही., असंही नवाब मलिक यांनी यावेळी सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी –
पुण्यात पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच; सुप्रिया सुळेंनी फुंकले महापालिका निवडणुकीचे रणशिंग
“शिवसेना यंदा साजरी करणार भगवी दिवाळी; औरंगाबादमध्ये 50 हजार घरांवर फडकवणार भगवा”
चंद्रकांत पाटील म्हणाले ‘असे नेते आमच्या खिशात’; आता नवाब मलिक म्हणतात…