Home महत्वाच्या बातम्या बुलढाणात काँग्रेसचा भाजपाला धक्का! नगराध्यक्षांसह जिल्हा परिषद सदस्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

बुलढाणात काँग्रेसचा भाजपाला धक्का! नगराध्यक्षांसह जिल्हा परिषद सदस्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. चिखली येथील नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे भाजपाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासह भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला आहे. यावेळी महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर उपस्थित होत्या.

नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे व त्यांचे पती कुणाल बोंद्रे यांच्यासह 1 नगरसेवक व 3 पंचायत समिती सदस्य आणि एक जिल्हा परिषद सदस्यही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार आज बोंद्रे यांची घरवापसी झाली.

हे ही वाचा : पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ येणार एकाच व्यासपीठावर

चिखली येथील यशोमती ठाकूर यांच्या उपस्थित पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे आणि त्यांचे पती माजी उपनगराध्यक्ष कुणाल बोंद्रे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गोपाल देवडे आणि जिल्हा परिषद सदस्य शाम पठाडे हे देखील काँग्रेसमध्ये सामील झाले.

दरम्यान, आज चिखली जिल्हा.बुलढाणा येथील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांवर विश्वास ठेऊन तसेच भाजपाच्या हुकुमशाही राजवटीला कंटाळुन जिल्हाध्यक्ष राहुलजी बोंद्रे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात केला. यावेळी बुलढाणा जिल्ह्याची संपर्कमंत्री म्हणुन सर्व सन्माननिय पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षामध्ये सन्मानाने प्रवेश घेतला.” असं यशोमती ठाकूर यांनी पक्षप्रवेशाच्यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; कोकणात असंख्य समर्थकांसह ‘या’ पक्षाचे चार बडे नेते राष्ट्रवादीत

‘राजकारणात येण्यासारखे मुख्यमंत्र्यांमध्ये एकही गुण नाही’; निलेश राणेंचा टोला

 जळगावमध्ये भाजपाला मोठा धक्का; ‘या’ निवडणुकीत एकनाथ खडसेंचा विजय निश्चित