आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : 28 ऑक्टोबर रोजी एमएमआरडीएने मुंबईत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांनी मिस्किलपणे भाष्य केले. यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
हे ही वाचा : जळगावमध्ये भाजपाला मोठा धक्का; ‘या’ निवडणुकीत एकनाथ खडसेंचा विजय निश्चित
कालच्या कार्यक्रमादरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधक त्यांच्यावर निशाणा साधत आहे. यावरूनच निलेश राणे यांनीदेखील त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. “त्या वक्तव्यावर हसावं की रडावं यावर? हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तुम्ही राजकारणात का आलात हाच सर्वांना प्रश्न पडतो. कारण तुमच्यात राजकारणात येण्यासारखे एकही गुण नाही. म्हणून पवारांनी तुम्हाला CM केले, त्यांना असेच लागतात. अभ्यास केला असता तर अधिवेशनात बिनधास्त व महाराष्ट्राच्या सगळ्या प्रश्नांवर न पचकता बोलता आले असते.” असं निलेश राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, अभ्यास करणे आमचे काम नाही, तसे असते तर राजकारणात आलोच नसतो. पण मार्क देण्याचे काम आमच्याकडे आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
हसावं की रडावं यावर? हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. तुम्ही राजकारणात का आलात हाच सर्वांना प्रश्न पडतो कारण एकही गुण नाही, म्हणून पवारांनी तुम्हाला CM केले, त्यांना असेच लागतात. अभ्यास केला असता तर अधिवेशनात बिनधास्त व महाराष्ट्राच्या सगळ्या प्रश्नांवर न पचकता बोलता आलं अस्त. pic.twitter.com/IMAKMhEA1Q
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 29, 2021
महत्वाच्या घडामोडी –
भाजप हे एक अजब रसायन, स्वतःच स्वतःला क्लीन चिट देत सुटले; शिवसेनेचा टोला
काँग्रेस पक्षात इनकमिंग सुरुच; अहमदनगरमधील ‘या’ मोठ्या नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश