आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी 11 ऑक्टोबर पासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाली. या निवडणुकीसाठी 21 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र निकालाच्या आगोदरच जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे.
हे ही वाचा : भाजप हे एक अजब रसायन, स्वतःच स्वतःला क्लीन चिट देत सुटले; शिवसेनेचा टोला
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेदरम्यान अमळनेर येथे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील तर मुक्ताईनगर मधून नाना पाटील यांचा अर्ज बाद झाल्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे यांची निवड बिनविरोध झाल्याचं निश्चित झालं आहे. यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली.
दरम्यान, या अगोदर भाजपच्या स्मिता वाघ, नाना पाटील, माधुरी अत्तरदे, भारती चौधरी यांच्यासह खासदार रक्षा खडसे यांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अवैध ठरवण्यात आले होते. यामुळे भाजपमध्ये संतापाची लाट उसळली होती.
महत्वाच्या घडामोडी –
काँग्रेस पक्षात इनकमिंग सुरुच; अहमदनगरमधील ‘या’ मोठ्या नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
हे सरकार फक्त एकाचं विषयावर गंभीर आहे, ते म्हणजे…; चित्रा वाघ यांची टीका