Home महाराष्ट्र शिवसेनेत प्रवेशाचा धडाका; बहुजन विकास आघाडीचे तीन नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेत प्रवेशाचा धडाका; बहुजन विकास आघाडीचे तीन नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

वसई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. आज वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला शिवसेनेने मोठे खिंडार पाडले असून बहुजन विकास आघाडीचे तीन नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळं वसई विरारमध्ये शिवेसनेची ताकद अधिकच वाढली आहे.

हे ही वाचा : एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का?; क्रांती रेडकरचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

बहुजन विकास आघाडी च्या नगरसेवक सुरेश चौधरी , नगरसेवक किशोर पाटील आणि नगरसेविका पुतूल झा आणि अकरा प्रमुख पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तर तलासरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्षांसहित संपूर्ण तालुका कार्यकारणीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला.

दरम्यान, यावेळी संपर्क प्रमुख आमदार रविंद्र फाटक हे उपस्थित होते. दरम्यान, वसंत चव्हाण यांनी आजचा पक्ष प्रवेश हा प्रातिनिधीक स्वरुपाचे आहेत. यापुढेही मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेशाचे सोहळे होणार असल्याचे म्हटले आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“राष्ट्रवादीत इनकमिंगचा धुमधडाका, ‘या’ पक्षातील नेत्यांनी हाती बांधलं घड्याळ”

“मनसेचं मिशन विदर्भ; अकोला महापालिका निवडणूक मनसे स्वबळावर लढणार”

पेट्रोल, डिझेलची दरवाढ आपल्या भल्यासाठीच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्राला टोला