Home महाराष्ट्र सरकार पडत नाही म्हणून बदमान करण्याचा प्रयत्न सुरू आहे; जयंत पाटलांची भाजपावर...

सरकार पडत नाही म्हणून बदमान करण्याचा प्रयत्न सुरू आहे; जयंत पाटलांची भाजपावर टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : आर्यन खान ड्रग्स प्रकरणात दिवसेंदिवस नव्या घडामोडी घडताना दिसत आहे. याच मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते ठाण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे पुराव्यासहीत पितळ उघडे केले. त्यामुळे या प्रकरणी योग्य ती पावले टाकली जातील, असं सांगतानाच महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांकड्न सातत्याने सरकार अस्थिर करण्याचा पूर्ण प्रयत्न झाला, मग शेवटी सरकार पडत नाही म्हटल्यावर सरकार व मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आर्यन खान प्रकरण हे त्यातीलच एक आहे, अशा शब्दात पाटील यांनी भाजपर हल्लाबोल केला.

हे ही वाचा : मनसेत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; घाटकोपरमध्ये अनेकांचा मनसेत प्रवेश

आर्यन खान प्रकरण हे बोगस आहे. मलिक यांनी पुराव्यासहीत या प्रकरणातील सत्य बाहेर काढलं. आज समीर वानखेडे यांचे जन्मप्रमाणपत्र प्रसारीत केले आहे. त्यावरून समीर वानखेडे यांनी मागासवर्गीय असल्याचे दाखवून फायदा मिळवला असल्याचे दिसत आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

प्रभाकर साईल यानेही एनसीबी व समीर वानखेडे यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. आयटी या यंत्रणा कमी पडल्यामुळे आता एनसीबी ॲक्टीव झालेली दिसते. विरोधकांकडून मुंबईतील बॉलिवूड आणि महाराष्ट्राला करण्याचं हे षडयंत्र आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

महत्वाच्या घडामोडी – 

बायकोनं मारलं तरी सांगतील की यात केंद्र सरकारचा हात आहे- देवेंद्र फडणवीस

“शरद पवारांच्या रूपानं राष्ट्रवादीला देशाचा एक सर्वोच्च नेता मार्गदर्शक म्हणून लाभला”

“समीर वानखेडे हा काही भाजपचा कार्यकर्ता नाही, त्यामुळे त्याची पाठराखण करायचा विषय येत नाही”