आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली : भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या विधानामुळे झालेला वाद ताजा असतानाच आता भाजपच्या आणखी एका नेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे.
माझ्यामागे कधीही सक्तवसुली संचलनालयाचा ससेमिरा लागणार नाही. कारण मी भाजपचा खासदार आहे, असे वक्तव्य सांगली जिल्ह्याचे खासदार संजयकाका पाटील यांनी केलं आहे. ते शनिवारी विट्यात एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : शाहरूख खानने भाजपमध्ये प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं असं सांगतील; भुजबळांचा टोला
आम्ही राजकीय माणसं नसताना कर्ज काढून दाखवतो. आमची कर्ज पहिली की ईडी म्हणेल ही माणसं आहेत का काय, असं संजयकाका पाटील यांनी म्हटलं आहे. स्थानिक नेत्यांनी कर्ज आणि संपत्ती वरून केलेल्या भाष्याच्या अनुषंगाने त्यांनी हे वक्तव्य केले.
दरम्यान, मोदी सरकारकडून महाराष्ट्रातील राजकीय विरोधकांविरोधात केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातो, असा आरोप सातत्याने होतो. अशातच संजकाका पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यांमुळे विरोधकांच्या दाव्याला एकप्रकारे पुष्टी मिळताना दिसत आहे.
महत्वाच्या घडामोडी –
हिंमत असेल तर मैदानात येऊन दाखवा; चंद्रकांत खैरेंचं इम्तियाज जलील यांना आव्हान
‘या’ कार्यक्रमासाठी अमित शहा आणि शरद पवार येणार एकाच मंचावर
नाशिकमध्ये शिवसेना देणार भाजपला धक्का! संजय राऊतांच्या मेळाव्यात भाजपचे नगरसेवक