मुंबई : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
माझ्या वडिलांनी नोकरी कुठे करावी यासाठी मला ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे घेऊन गेले होते., असं म्हणत वळसे पाटलांनी जूनी आठवण सांगितली. ते एका मुलाखतीत बोलत होते.
हे ही वाचा : नाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार- संजय राऊत
पदवी घेतल्यानंतर कुठेतरी नोकरी करावी, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. त्यासाठी ते मला शरद पवार यांच्याकडेही घेऊन गेले होते. परंतु, नोकरी करण्यापेक्षा राजकारणात जावे, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे 1981 ते 1988 या कालावधीत शरद पवारांचा स्वीय सचिव म्हणून मी काम पाहिले. त्यामुळे अनेकांचा सहवास लाभला. ओळखी वाढल्या, असं वळसे पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“सत्तेचा गांजा नसानसात भिनल्याने, समीर वानखेडेंच्या बायकोवर अभद्र भाषेत टिका सुरू आहे”
“भाजपला मोठा धक्का, लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज बाद”
“ठाण्यात शिवसेनेची ताकद वाढली; विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश”