आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : जर तुम्ही साथ दिली तर पुढचे मुख्यमंत्रीही उद्धव ठाकरेच होणार’, अशी भावनिक साद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिली. पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी भाजप सरकारवर सडकून टीकास्त्र सोडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामांचं कौतुक केले.
हे ही वाचा : राज ठाकरेंना ओळखत नाही म्हणून वॉचमनला मारहाण?;अभिनेत्रीची गुंडगिरी
आज राज्यातील अनेक मंत्र्यांवर केंद्रातील तपास यंत्रणाचा गैरवापर करून महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांवर दबाव टाकला जात आहे. सत्ता आहे म्हणून केंद्रातील हे सरकारअसे कट कारस्थान रचत आहे. भाजप हे देशावर आलेलं मोठे संकट आहे. त्यांना दूर केले पाहिजे. तुम्ही कितीही ईडी लावा, सीबीआय लावा काहीही झालं तरी महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असंही शरद पवार म्हणाले आहेत.
सुदैवाने उद्धव ठाकरेंच्या हातात राज्याची धुरा दिली आहे. औद्योगिक धोरणांमध्ये जी कामाची गरज आहे ती पूर्ण करतोय. आज केंद्राकडून राज्याला मदत होत नाही. राज्याचे पैसे मिळत नाही, जीएसटीचे तीस हजार कोटी मिळाले अद्यापही मिळाले नाही. मदत करण्यापेक्षा राज्यातलं सरकार पडायचे प्रयत्न करतात, ईडी, सीबीआयचा वापर करतात. मुंबईचे माजी पोलीस कमिशनर गायब होतो ही गोष्ट इतिहासात घडली नाही, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
‘या’ महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी लढणार एकत्र
“ठाकरे सरकारकडून सर्वसामान्यांना मोठं गिप्ट; दिवाळीनंतर 1 डोस झालेल्यांना सर्वत्र फिरण्याची मुभा?”
निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची खेळी; एकाच पक्षातील दोन उमेदवार एकमेकांविरोधात उभारणार