आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली. चंद्रकांत पाटील यांनी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : भाजपने बेईमानी केली नसती, तर उद्धव साहेबही बेईमान झाले नसते- गुलाबराव पाटील
अमोल मिटकरी यांनी एका शायरीद्वारे पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. सुप्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांच्या शायरीतून पाटील यांना प्रत्युत्तर दिलं.
‘तेरी जुबान कतरना बहुत जरुरी है… ‘तुझे मर्ज है की तू बार-बार बोलता है!’ असा शेर त्यांनी म्हटला आहे. तसेच ‘शरद पवार हे जेव्हा संसदेत होते. त्यावेळी हे महाशय चड्डी आणि टोपीत होते, असा टोला मिटकरींनी यावेळी चंद्रकांत पाटलांना लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपने बेईमानी केली नसती, तर उद्धव साहेबही बेईमान झाले नसते- गुलाबराव पाटील
पुणे, नाशिकनंतर आता मनसेची मुंबई मोहीम; 23ला भांडुपमध्ये होणार मेळावा
उद्धव ठाकरे बायकोच्या नावाने घोटाळे करतात; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल