आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : 2024 च्या निवडणूकीत शिवसेना केंद्रस्थानी असेल, असं भाकीत संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील एकूण 48 जागांपैकी 13 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला होता. आता संपूर्ण देशाला 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. या निवडणुकीत शिवसेना केंद्रस्थानी असेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा- अनंत करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक
“शिवसेना पक्षप्रमुख पक्षाची दिशा ठरवतील. शिवसेना कोणती भूमिका घेणार, हे पूर्ण देशाला कळणार आहे. शिवसेना राष्ट्रीय राजकारणात आहेच. दादरा आणि नगर हवेलमीमधून आमचा आणखी एक खासदार निवडून येईल. त्यामुळे आता आमचे 22 खासदार होतील. 2025 नंतर शिवसेना देश पातळीवरील राजकारणात केंद्रस्थानी असेल.” असंही संजय राऊत म्हणाले आहे.
महत्वाच्या घडामोडी –
सायकल चोरणारे नारायण राणेही शिवसेनेमुळे मुख्यमंत्री झाले- गुलाबराव पाटील
बाकी ठिकाणी धाडी पडल्या तर चालते, आणि घरी पडल्या तर…- चंद्रकांत पाटील
मी कोणत्याही मंत्रीपदावर नाही, याचं मला कोणतंही दु:ख नाही- पंकजा मुंडे