मुंबई : महाविकास आघाडीच्या कुकृत्याचं, कारभाराचा आणि भ्रष्टाचार याविषयी एक पेपर काढून आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील सरकार याबद्दल बदनामीचा कट सुनियोजितपणे तिन्ही पक्ष एकत्र कसे रचत आहेत याचा भांडाफोड आम्ही जनतेसमोर करणार आहोत, असा इशारा भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिलाय.
‘महाराष्ट्रातील जनतेला जी मदत सेवासुविधा आवश्यक आहेत, विकास करू शकत नाहीत, शेतकऱ्याला काहीही मिळत नाही, विद्यार्थ्याला मिळत नाही, बारा बलुतेदारांचा मिळत नाही, आमच्या दलित समाजाच्या बंधू-भगिनींना मिळत नाही, मराठा समाजाला मिळत नाही, म्हणून आम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या हक्कासाठी आंदोलनाची रुपरेषा सुध्दा आज आम्ही ठरवली आहे. येणाऱ्या काळात आम्ही सत्ताधारी आघाडीला सळो की पळो करुन सोडू, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.
दरम्यान, आपल्या खोट्या कल्पनांवर स्वतःच्या विजयाची गुढी उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, तो सफल होऊ शकत नाही. महाराष्ट्रातली जनता त्याला थारा देऊ शकत नाही, असंही आशिष शेलारांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
तुम्ही मुख्यमंत्री नाहीत हे मनातून काढून टाका; नवाब मलिकांचा फडणवीसांना टोला
राज ठाकरेंचे शिलेदार फडणवीसांच्या भेटीला, मनसे-भाजप युती होणार?; चर्चांना उधाण
भाजपचा महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका; पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
देवेंद्र फडणवीस म्हणाले मी मुख्यमंत्री नाही असं वाटतंच नाही; पंकजा मुंडे म्हणतात…