आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : नुकतेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निकालामध्ये भाजपनेमोठे यश मिळवल्यानंतर इतर पक्षातील नेत्यांचा कल भाजपकडे असल्याचे दिसत आहे. त्यामुळे इतर पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपात येण्यास उत्सुक आहेत.
आज भाजपने मराठवाड्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला मोठा दणका दिला. परभणीशहर आणि जिल्ह्यातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या अनेक पधाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितित भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा भाजपने केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपकडून होताना दिसत आहे.
महत्वाच्या घडामोडी –
देवेंद्र फडणवीस म्हणाले मी मुख्यमंत्री नाही असं वाटतंच नाही; पंकजा मुंडे म्हणतात…
भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का; मराठवाड्यातील ‘या’ माजी मंत्र्यांचे बंधू भाजपच्या वाटेवर
“जनतेनं मला कधीच जाणवू दिलं नाही की, मी मुख्यमंत्री नाही, मी आजही मुख्यमंत्री आहे असंच मला वाटतं”
“विराट कोहलीनंतर आता ‘हा’ भारतीय खेळाडू आयपीएलचं कर्णधारपद सोडणार?”