आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नांदेड : मागील काही दिवसांपासून विरोधक सातत्याने महाविकास आाघाडी सरकारवर निशाणा साधत असल्याचं पहायला मिळत नाही. यातच भाजपच्या एक नेत्याने शिवसेनेचा 12 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात असून लवकरच सत्तापालट होइल, असा दावा भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला आहे. तसेच, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली असली तरी आता लवकरच हे पक्ष वेगळे होतील, असंही बबनराव लोणीकर यांनी म्हटलं.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील देगलोर बिलोली विधानसभा लवकरच पार पडणार असून या निवडणुकीत भाजपचे सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत बबनराव लोणीकर बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
पुण्यानंतर आता नाशिकमध्येही मनसेच्या नेत्यांची भाजपसोबत युतीची मागणी
“प्रियांका गांधींमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची झलक दिसते”
जळगावमध्ये भाजपचा शिवसेनेला धक्का; शिवसेनेमध्ये गेलेल्या बंडखोर नगरसेवकांची घरवापसी
सामनाचं नाव बदलून आता बाबरनामा ठेवा; गोपीचंद पडळकरांची टीका