जीममध्ये अति वजन मारताय मग सावधान! बेंच प्रेस मारताना बॉडी बिल्डरच्या फाटल्या मांसपेशी, पहा व्हिडीओ

0
162

नवी दिल्ली : दुबईमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जीममध्ये एक्सरसाईज करत असताना बाॅडी बिल्डर मांसपेशी फाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मुळचा इंग्लंडचा असणाऱ्या या बिल्डरचं नाव रायन असं आहे. हा बिल्डर दुबईमध्ये एका जिममध्ये एक्सरसाईज करत होता. रायन हा बेंच प्रेस करत असताना बार वजन वरच्या बाजून नेत होता. याचदरम्यान अचानक त्याच्या उजव्या हाताच्या मांसपेशी फाटल्या आणि तो आरडा ओरडा करु लागला.

रायन हा मुळचा इंग्लंडचा असल्यामुळे त्याला दुबईमध्ये त्याचा इंश्यूरन्स मेडिकल बिल भरणं कठीण होतं. यामुळे रायनचा कोच लॅरी याने एका फंड पेजच्या माध्यमातून रायनच्या उपचारासाठी पैशांची मागणी केली होती. पाच दिवसात 27 लाख रुपये जमा झाले होते. रायनची सर्जरी करण्यात आली असून त्याने त्याच्या इंस्टावरुन त्याबाबत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मिडीयावर लॅरी यांनी शेअर केला असून या व्हिडीओनंतर रायनच्या हाताचा फोटो देखील आहे. तसेचं रायनची सर्जरी 1 तासाची होती. मात्र ती दुर्देवाने 7 तासाची झाल्याचं रायनने त्याच्या इंस्टाच्या एका पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Larry (@larrywheels)

 

View this post on Instagram

 

A post shared by Larry (@larrywheels)

महत्वाच्या घडामोडी –

भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार व्हायचे का?; रोहित पवारांचा प्रश्न

देवेंद्र फडणवीसांकडून ठाकरे सरकारचं कौतूक; म्हणाले…

“राज्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी”

“… ठाकरे सरकार, हे तुम्हीच करून दाखवलं!”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here