Home महाराष्ट्र “खोटं बोलणारी लोकं बाळासाहेबांना आवडत नव्हती, म्हणून अशा लोकांना त्यांनी पक्षातून काढलं”

“खोटं बोलणारी लोकं बाळासाहेबांना आवडत नव्हती, म्हणून अशा लोकांना त्यांनी पक्षातून काढलं”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले आहेत.मात्र व्यासपीठावरुन बोलताना नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. नारायण राणे केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं

नारायणराव आपण म्हता ते खरं आहे. तुम्ही जी विकासकामं केली त्यात तुमचं योगदान नक्की आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद नक्की देतो. पण कोकणची जनता डोळे मिटून कधीच राहत नाही. ती शांत आहे, संयमी आहे. म्हणून सदासर्वदा भयभीत होऊन ती काही करेल असं अजिबात नाही, ती मर्द आहे. म्हणूनच त्या जनतेनं तिच्या हक्काचा लोकप्रतिनिधी अनेक वर्षांपासून निवडून दिला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले..

हे ही खरं आहे की, बाळासाहेबांना खोटं बोलणारी लोकं आवडत नव्हती. म्हणूनच अशी खोटं बोलणारी लोकं त्यांनी शिवसेनेतून काढून टाकली होती, हा सुद्धा इतिहास आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

महत्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरे, नारायण राणे व्यासपीठावर एकत्र; रामदास आठवलेंची भन्नाट कविता, म्हणाले…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तोंडावर राज ठाकरेंचा मोठा निर्णय; रुपाली पाटील यांना दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

“मी जर रखेल किंवा बाजारू बाई असते तर मी ही लढाई लढले नसते”

“…हा बाळासाहेबांचा आम्हाला आशीर्वाद असल्यासारखा आहे”